Home Cities भडगाव पिचर्डे विकास सोसायटीच्या चेअरमनपदी हेमराज पाटील; व्हाइस चेअरमन प्रविण कुंभार

पिचर्डे विकास सोसायटीच्या चेअरमनपदी हेमराज पाटील; व्हाइस चेअरमन प्रविण कुंभार

0
34

भडगाव – लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पिचर्डे विविध कार्यकारी विकास सोसायटीच्या चेअरमनपदी हेमराज पाटील तर व्हाइस चेअरमन म्हणून प्रविण कुंभार याची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. याबाबत सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

पिचर्डे विविध कार्यकारी विकास सोसायटीच्या चेअरमन व व्हा चेअरमन पदाची निवड प्रक्रिया आज राबविण्यात आली. या निवडीदरम्यान इश्वरचिट्ठी काढण्यात आली. त्यानुसार चेअरमनपदी हेमराज प्रकाश पाटील तर व्हा चेअरमन पदी प्रविण सजन कुंभार याची निवड करण्यात आली.

यावेळी माजी चेअरमन मुरलीधर रामा पाटील, मा. व्हा चेअरमन अशोक धर्मराज पाटील, उध्दव नामदेव महाजन, श्रीधर रामदास पाटील, हिलाल ओकार महाजन, साहेबराव दौलत पाटील, श्रावण रतन लिडायत, बबन मन्साराम पाटील, बेबाबाई भालचंद्र पाटील, ज्योती सचिन पाटील, सेक्रेटरी एन.टी.पाटील, क्लॉर्क वसंत पंडीत पाटील, निबा बाबुलाल पाटील आदी उपस्थित होते. दरम्यान निवडणुक निर्णय अधिकरी म्हणुन अविनाश पाटील यांनी काम पाहीले. यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound