पिंप्री शेतशिवारातून चोरट्यांनी लाबविली लोखंडी बैलगाडी

crime bedya

रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील पिंप्री शिवारातून अज्ञात चोरट्याने वाड्यासमोरुन सुमारे १० हजार रुपये किंमतीची बैलगाडी लांबवल्याची घटना ४ ते ५ फेब्रुवारीच्या मध्यरात्री घडली.

याबाबत रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पिंप्री येथील शेतकरी शांताराम महाजन यांच्या गट क्रमांक ८८ मधील शेतासमोर असलेल्या वाड्यासमोरुन 4 ते 5 च्या मध्यरात्रीच्या सुमारास दहा हजार रुपये किमतीची पुर्ण लोखंडाची असलेली बैलगाडी चोरट्याने लांबवली. शेतकरी शांताराम महाजन यांच्या फिर्यादीवरुन रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार जितेंद्र जैन करीत आहेत.

Protected Content