पिंप्री खुर्द ता.धरणगाव, प्रतिनिधी। कोरोना विषाणूचा संसर्गामुळे संपूर्ण जग हादरले असून दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. या कोरोना विषाणूची साखळी खंडित करण्यासाठी पिंप्री येथे शंभर टक्के बंद पाळण्याचा नागरिकांनी सर्वानुमते निर्णय घेतला होता. त्यानुसार २ ते ४ मे जनता कर्फ्यू पाळण्यात येत असून त्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
ग्रामपंचायत कार्यालयामार्फत कोरोना समितीची नुकतीच बैठक घेण्यात आली. या बैठकीत कोरोना समितीचे अध्यक्ष सरपंच योगिता विजय सूर्यवंशी, सचिव, पोलीस पाटील गोपाल रामदास पवार, जि. प. सदस्य गोपाल चौधरी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, तलाठी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. या बैठकीत २ ते ४ मे असे तीन दिवस कडकडीत बंद करण्याचा निर्णय एकमुखाने घेण्यात आला होता. त्यानुसार आजपासून तीन दिवस पिंप्री येथे जनता कर्फ्यू पाळण्यात येत आहे. या जनता कर्फ़्युला नागरिकांनी संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन ग्रामपंचायत तसेच कोरोना समितीतर्फे करण्यात होते. त्यांच्या आवाहनाला गावकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद देऊन १०० % बंदला पाठिंबा दिला आहे. आज गावात शुकशुकाट पहावयास मिळत आहे.