चाळीसगाव, प्रतिनिधी । कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापण यंत्रणा आत्मा अंतर्गत तालुक्यातील पिंप्री बु. येथील साईकृपा शेतकरी गटातील ४० शेतकऱ्यांना मोफत लोहयुक्त बाजरी आदिशक्तीचे बियाणे गटाचे अध्यक्ष यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापण यंत्रणा आत्मा अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र जळगाव यांच्यातर्फे मोफत बाजरीचे बियाणे वितरीत करण्यात येत आहेत. तालुक्यातील पिंप्री बु. प्रथम रेशीय प्रात्यक्षिक आत्मा अंतर्गत साईकृपा शेतकरी गटाला आदिशक्तीची वाण असलेली बाजरीचे बियाणे ४० शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आले. साईकृपा शेतकरी गटाचे अध्यक्ष सुभाष जुलाल पाटील यांच्या हस्ते हे बियाणे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर यावेळी २० शेतकऱ्यांना ज्वारीचे बियाणे वाटप करण्यात आले. बियाणे वाटपाप्रसंगी कृषि विज्ञान केंद्रचे शाश्रज्ञ किरण मांडवडे, डॉक्टर स्वाती कदम, कृषी विद्या आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक ज्ञानेश्वर पवार आदी उपस्थित होते.