पिंप्री ग्रामपंचायततर्फे ‘आर्सेनिक अल्बम-३०’ औषधीचे वाटप

पिंप्री प्रतिनिधी । पिंप्री ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गावातील प्रत्येक कुटुंबियांना रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या ‘आर्सेनिक अल्बम-३०’ औषधीचे वाटप करण्यात आले.

गावात जवळपास २५०० बॉटलचे वाटप करण्यात येत आहेत. यापूर्वी गावात ४ वेळा हायड्रोक्लोराडची फवारणी, परिवारातील प्रत्येक सदस्यास मास व सॅनिटायझर बॉटलचे वाटप करण्यात आले आहे. या उपक्रमास आसपासून सुरू करण्यात आली आहे. याप्रसंगी सरपंच पती विजय सुर्यवंशी, उपसरपंचपती देविदास चौधरी, माजी सरपंच अरूण पवार, नाना बडगुजर, शिवाभाऊ बडगुजर, राकेश चौधरी, मनोज पांडे, राजू बिजाविरे, बापू बडगुजर अनुसयाताई सोनवणे, गीताबाई सोनवणे, ग्रामविकास अधिकारी सुनिल बोरसे, मंडळ अधिकारी सुरेश बोरसे, तलाठी सचिन कलोरे, स्वंच्छतागृही बाळू चौधरी, भरत शिंपी, निलेश बडगुजर, कर्मचारी सुभाष सोनवणे, तुषार चौधरी, राजू राठोड आदी उपस्थित होते.

Protected Content