जळगाव प्रतिनिधी । पिंप्राळ्यात राजरोसपणे सुरू असणारे देहविक्रीचे रॅकेट सहाय्यक पोलीस अधिक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या पथकाने उद्ध्वस्त केले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पिंप्राळ्यात एका अपार्टमेंटमध्ये एक महिला फ्लॅट भाड्याने घेऊन देहविक्रयचा व्यवसाय करत असल्याची माहिती सहायक पोलिस अधीक्षक डॉ. रोहन यांना मिळाली होती. त्यांच्या निर्देशानुसार पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांनी पथक तयार केले. त्यानुसार डॉ. निलभ रोहन आणि बापू रोहम यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक निता कायटे, पंकज शिंदे, दिनेश बडगुजर, वैशाली पाटील, सविता परदेशी, अनिल देशमुख आदींचे पथकाने शनिवारी सायंकाळी कारवाई केली. यात पोलिसांनी देहविक्रयचा व्यवसाय करणार्या सहा महिलांसह तीन आंबटशौकीनांता ताब्यात घेतले. त्यांच्याजवळ असलेली १८ हजार रुपयांची रोकडही या कारवाईत जप्त करण्यात आली आहे.