जळगाव प्रतिनिधी । अवैध वाळू उपशावरून अनेक वेळा शासनाकडे तक्रारी आल्या आहेत. त्यावरून हाणामारी झाल्या आहेत. असाच प्रकार बुधवारी सकाळी पुन्हा घडून आला आहे. एका तरुणाला दोन जणांनी बेदम मारहाण केल्याची फिर्याद दाखल झाली आहे.
रोहन उत्तम चौधरी, रा.सावखेडा याने याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बुधवारी सकाळी 10. 30 वाजता शासनाच्या अधिकाऱ्यांना वाळूच्या ट्रॅक्टरची माहिती का दिली असा जाब विचारत संशयित गणेश पगारे व मनोज रमेश भालेराव रा.पिंप्राळा हुडको यांनीं लाठ्या काठ्यांनी रोहन चौधरी यास मारहाण केली असे फिर्यादीत नमूद आहे. रामाननंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून तपास सतीश डोलारे करीत आहे. दरम्यान गिरणा नदी पत्रात दिवसरात्र आजही वाळू उपसा सुरूच आहे.