जळगाव प्रतिनिधी । शहरातील पिंप्राळा हुडको येथील हातमजूराने झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी ६ वाजता घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी की, ज्ञानेश्वर भानु चव्हाण (वय-३५) रा. मरीमाता मंदीराजवळ पिंप्राळा हुडको, जळगाव हे हातमजूरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. घरात पत्नी, मुलगीसह राहतात. सोमवारी १४ डिसेंबर रोजी दुपारी २ जेवण करून ते घरातून निघाले. बाहेर जावून येतो असे सांगून ज्ञानेश्वर घराबाहेर पडले. सायंकाळी उशीरा घरी न आल्यानंतर पत्नी व मुलीने त्यांचा शोध घेतला. घरापासून काही अंतरावर असलेल्या मोकळ्या मैदानाच्या झाडाला ओढणीने गळफास घेतल्याचे दिसून आले. पतीचा मृतदेह पाहून पत्नीने हंबरडा फोडला होता. गळफास घेण्याचे कारण अद्याप कळू शकले नाही. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो.ना. महेंद्र पाटील करीत आहे.