जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील पिंप्राळा हुडको येथे राहणाऱ्या विवाहितेला किरकोळ कारणावरून शारीरिक व मानसिक छळ करून मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामानंदनगर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पिंप्राळा हुडको येथील माहेर असलेल्या सनाबी अरबाज खान (वय-२०) यांचा विवाह मुक्ताईनगर येथील अरबाज खान यांच्याशी रीतीरीवाजानुसार लग्न झालेले आहे. लग्नाचे सुरुवातीचे दिवस चांगले गेल्यानंतर पती अरबाज खान हा कौटुंबिक कारणावरून तसेच किरकोळ कारणावरून विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच सासू, दीर, सासरे आणि नणंद यांनी देखील शारीरिक व मानसिक त्रास दिला. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी जळगाव येथे पिंप्राळा येथे निघून आल्या. त्यांनी मंगळवार २१ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती अरबाज खा, सासरे मजीद खान, सासू शमीमाबी मजीद खान, दीर समीर खान आणि नणंद नगमाबी मजीद खान सर्व रा. मुक्ताईनगर यांच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विनोद सूर्यवंशी करीत आहे.