जळगाव प्रतिनिधी । क्षुल्लक कारणावरून पिंप्राळा-हुडको परीसरात गुरूवारी रात्री १० वाजता दोन गटात वाद निर्माण झाला होता. यावेळी नागरीकांचा जमाव मोठ्या प्रमाणावर उपस्थित झाल्याने पोलीसांनी जमावबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, रामानंदनगर पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन गोंधळ शांत केला.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, क्षुल्लक कारणावरून पिंप्राळा-हुडको परिसरातील दूध फेडरेशन भागात दोन गटात वाद झाला. त्यात झोंबाझोंबी होऊन गोंधळ निर्माण झाला. दरम्यान, दुध फेडरेशन परिसरात गोंधळ सुरू असून मोठ्या प्रमाणात जमाव जमल्याची माहिती रामानंदनगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार लागलीच गस्तीवर असलेले विजय जाधव, सतीष निकम, सुशांत विसपुते, गणेश देसले, जगदीश बारेला आदींनी घटनास्थळी धाव घेतली. नंतर जमाव पांगवून त्यांनी झोंबाझोंबी करून जमाव जमविल्याप्रकरणी नाना सुरेश चौधरी, नीलेश अशोक पारेराव, शंकर किसन जाधव, आकाश कैलास दामोधर, विशाल भास्कर पवार, आकाश राजू खैरे, फरीद रौउफ खाटीक, अय्युब शेख चाँद, शाहरूख शेख रईस (रा़ दुध फेडरेशन, पिंप्राळा-हुडको) यांना अटक करण्यात करण्यात आली. अखेर शुक्रवारी सकाळी विजय जाधव यांच्या फिर्यादीवरून या ९ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.