पिंप्राळा हुडकोत महिलेला मारहाण करत तिच्या पतीला धमकी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पिंप्राळा हुडकोत शिवीगाळ करत जोरजोराने बोलू नका असे सांगितल्याच्या रागातून तीन जणांनी महिलेच्या दगड डोक्यात दगड मारत तिच्या पतीला शिवीगाळ करत धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 

पिंप्राळा हुडकोत बौध्द वसाहत येथे सरला संतोष बोरसे वय २८ या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. २३ एप्रिल रोजी बोरसे यांच्याकडे पाहुणे आले होते. याचदरम्यान सकाळी ९ वाजता गल्लीत शिवीगाळ तसेच मोठमोठ्याने बोलण्याचा आवाज येत असल्याने सरला बोरसे यांनी गल्लीत राहणारे अनिल भगवान सोनवणे ऊर्फ मारी या उद्देशून आमच्या घरी पाहुणे आले असून शिवीगाळ करुन नका तसेच मोठमोठ्याने बोलू नका असे सांगितले, याचा राग आल्याने अनिल सोनवणे याने सरला बोरसे यांच्या कपाळावर दगड मारुन दुखापत केली, तर भगवान सोनवणे व सुमन सोनवणे यांनी सरला बोरसे यांचे पती संतोष बोरसे यांना शिवीगाळ करत काय करायचे ते कर, आम्ही पोलिसांना घाबरत नाही, अशी धमकी दिली, याप्रकरणी सरला बोरसे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अनिल भगवान सोनवणे ऊर्फ मारी, भगवान सोनवणे, सुमन सोनवणे तिन्ही रा. बौध्द वसाहत पिंप्राळा हुडको या तिघांविरोधात रामनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विनोद सुर्यवंशी हे करीत आहेत.

Protected Content