पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची वॉश आऊट मोहीम : शिंदाड परिसरातील दारु निर्मिती अड्डा उध्वस्त

 

 

पाचोरा, प्रतिनिधी ।   तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी अवैध धंद्याच्या विरोधात वॉश आऊट मोहीम उघडल्याने अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

गुरुवार  दि. १५ एप्रिल रोजी  पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक निता कायटे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ. रणजित  राजपूत, पो. कॉ. अरुण राजपूत यांनी मिळालेल्या गुप्त माहितीवरून शिंदाड येथून जवळच असलेल्या सार्वे – पिंप्री धरणाच्या परिसरातील गावठीदारु निर्मीतीच्या अड्यावर धाड टाकली. या कारवाईत  सुमारे २४ हजार रुपये किंमतीचे गुळ व नवसागर मिश्रित कच्चे रसायन असलेले २०० लिटर क्षमतेचे सहा प्लास्टिक ड्रम, त्यात गुळ व नवसागर मिश्रित कच्चे रसायन असलेले सहा प्लास्टिकचे ड्रम प्रत्येकी २०० लिटर रसायन अंदाजे १ हजार २०० लिटर, ४ हजार रुपये किंमतीचे एक २०० लिटर क्षमतेच्या पत्री ड्रम मध्ये अंदाजे १८० लिटर गावठी हातभट्टी दारु तयार करण्याचे गुळ व नवसागर मिश्रित पक्के रसायन, अंदाजे १ हजार २५० रुपये किंमतीची तीस लिटर क्षमतेच्या प्लास्टिक कॅनमध्ये २५ लिटर गावठी हातभट्टीची दारु असा ३० हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल संदिप बजरंग राजपूत यांच्या फिर्यादीवरून आरोपी अनिल मासुम तडवी (वय – २६) व भुरा शरीफ तडवी (वय -२५) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Protected Content