चाळीसगाव, प्रतिनिधी | दवाखान्यात जाऊन येते, असे सांगून गेलेल्या विवाहीता हरवल्याची घटना तालुक्यातील पिंपरखेड येथे उघडकीला आला आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड येथील फरीदाबी शेख शेमशेर (वय-२७) हि विविहीत महिला २३ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास घरच्यांना मी चाळीसगाव येथे दवाखान्यात जाऊन येते असे सांगून गेले. मात्र फरीदाबी शेख शेमशेर ह्या अद्यापपर्यंत घरी परतल्याच नाही. त्यावर घरच्यांनी तिला आजपावेतो परिसरात व नातेवाईकांकडे शोधाशोध केली. परंतु फरीदाबी हि विवाहित महिला मिळून आले नाही. हरवल्याची खात्री झाल्यावर फरीदाबी यांचे वडील शमशेद शेख गुलषद यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात हरवल्याची फिर्याद दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास दिपक ठाकूर हे करीत आहेत.