पिंपरखेड आश्रम शाळेत माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात

*चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी* | तालुक्यातील पिंपरखेड तांडा येथील वसंतराव नाईक माध्यमिक आश्रम शाळेतील सन: १९९९ च्या दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा नुकतीच उत्साहात पार पडला. या अनोख्या मेळाव्याची चर्चा तालुक्यात जोरदार रंगत आहेत.

चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड तांड्यातील वसंतराव नाईक माध्यमिक आश्रम शाळेत सन: १९९९ मध्ये दहावी शिकून बाहेर पडलेल्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा नुकतीच १७ एप्रिल रोजी शाळेत घेण्यात आला. तत्पूर्वी कार्यक्रमाची सुरुवात स्व. वाडीलाल भाऊ राठोड यांच्या पुतळ्याला अभिवादन करून करण्यात आली. सदर मेळाव्याला एकूण ६४ माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. त्यापैकी अनेक जण हे सरकारी नौकरीत कार्यरत आहेत. दरम्यान यावेळी बहुतेकांनी आपले मनोगत व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. तर काहींनी या संस्थेने दिलेले संस्कार आजही आमच्यात पहायला मिळत असल्याचे भावना व्यक्त केल्या. त्याचबरोबर काहींचे ऊर भरून आले. यामुळे अशा अनोख्या पद्धतीने साजरा झालेला माजी विद्यार्थ्यांचा मेळावा कदाचित तालुक्यातील पहिलाच असल्याबाबत चर्चा सुरू आहे. तत्पूर्वी सदर मेळाव्याचे उद्घाटन चिटणीस राजेंद्र वाडीलाल राठोड ( सेवा. स. शि. प्र. मंडळ ) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राजू वाडीलाल राठोड, प्रा. बी. पी. पाटील, प्रा. एम. डी. बागुल, उगले सर व जगताप सर यांचे मोलाचे मार्गदर्शन माजी विद्यार्थ्यांना लाभले.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मच्छिंद्र राठोड (उपाध्यक्ष- सेवा. स. शि. प्र. मंडळ ) तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. बी.पी.पाटील व मुख्याध्यापक एम.डी.बागुल हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वासुदेव चव्हाण, भरत राठोड व भोसले आदींनी केले. यावेळी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी उपस्थित होते.

 

Protected Content