पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण (व्हिडिओ )

आव्हाणे, प्रतिनिधी । परिसरात पेरणीनंतर दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत होते. मात्र,आता पावसाने दडी मारल्याने परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

आव्हाणे परिसरात मागील १५ दिवसांपासून पाऊस नसल्याने पिकांची पाने पिवळी पडू लागले आहेत. पिकांवर रोगाईचे सावट पसरले असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेत आहेत. याप्रकारचे नैसर्गिक आपत्ती असतांना खतांची टंचाई जाणवत असल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. कापसाची लागवड ज्या शेतकऱ्यांनी केली ते आता धास्तावले असून पुन्हा कापूस लागवडीची पाळी शेतकऱ्यांवर आली आहे. काही शेतकऱ्यांना बोगस बियाणे मिळाल्याचेही प्रकार समोर येत आहेत. पाऊस नसल्याने पीक कोलमडुन चालले आहे. आलेला बहर गळुन जात आहे. पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांकडून जास्त दराने खरेदी केलेले कीटकनाशके फवारणी केली जात आहे. पीक वाचविण्यासाठी शेतकरी चातकासारखी पावसाची वाट पाहत आहे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1125011774551942/

Protected Content