मुंबई (वृत्तसंस्था) पार्थ पवार १८ वर्षाचा आहे. त्याने लोकसभा निवडणूक लढवलीय. त्यामुळे तो परिपक्वच आहे, असे वक्तव्य नारायण राणे यांनी केले आहे.
नारायण राणे यांनी पत्रकारांसोबत बोलतांना म्हणाले की, पार्थ पवार १८ वर्षाचा असून तो राजकारणात सक्रीय आहे. शिवाय त्याने निवडणूकही लढवली आहे. त्यामुळे तो परिपक्व आहेत. पार्थ यांनी केलेल्या मागणी मागे त्यांचे स्वत:चे म्हणून काही विचार असतील. त्यामुळेच त्यांनी हे विधान केले असेल, असेही राणे म्हणाले. दरम्यान, पार्थ पवार यांच्या पक्षविसंगत भुमिकेमुळे राष्ट्रवादीत मोठा वाद निर्माण झाला आहे. पार्थ पवार यांनी सुशांत सिंहच्या आत्महत्येची सीबीआय चौकशीची मागणी केली होती. तसेच एका जाहीर पत्रात जय श्रीरामचा नारा दिला होता. परंतू शरद पवार यांनी आपण पार्थच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नसल्याचे म्हटले होते.