पारोळ्यात सोमवारी जनता कर्फ्यू

 

पारोळा, प्रतिनिधी ।संभाव्य कोरोना विषाणुची दुसरी लाट येवु नये म्हणुन आज आमदार चिमणराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पारोळा तहसिल कार्यालयात येथे बैठकीचे आयोजन करण्यात येऊन सोमवारी जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आ. चिमणराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव पुन्हा वाढु नये म्हणुन मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, मास्क न घालणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही करणे, व्यापाऱ्यांनी मास्क न घालणाऱ्यांना दुकानात प्रवेश देवु नये अशा ठोस उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. तसेच सर्वानुमते सोमवारी जनता कर्फ्युचे आयोजन व मास्क न वापरणाऱ्यांवर २०० रूपये दंड आकारण्यात यावा असे निर्णय घेण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसिलदार अनिल गवांदे, पोलीस निरिक्षक लिलाधर कानडे, वैद्यकीय अधिक्षक योगेश साळुंखे, उपकेंद्र अधिक्षक प्रांजली पाटील, नगरपरिषद प्रतिनिधी संदानशिव मॕडम, शिवसेना शहरप्रमुख अशोक मराठे, मिलिंद मिसर, मा.नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील, पारोळा व्यापारी संघाचे अध्यक्ष केशवआण्णा क्षत्रिय, अरूणशेठ वाणी, नगरसेवक नितीन सोनार तसेच पारोळा व्यापारी वर्ग, विविध विभागातील अधिकारी, शहरातील प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते.

Protected Content