पारोळा प्रतिनिधी । येथे आजपासून सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेच्या दरम्यान अत्यावश्यक सेवांची दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
पारोळा शहरात दुकानांच्या वेळेवरून संभ्रम होता. तसेच अनेक व्यापार्यांची नाराजी होती. या पार्श्वभूमिवर शुक्रवारी नगराध्यक्ष करण पवार, उपनगराध्यक्ष मंगेश तांबे, आरोग्य सभापती दीपक अनुष्ठान यांनी सर्व व्यापार्यांची बैठक घेवून मते जाणून घेतली. यानंतर जिल्हाधिकार्यांना फोनवरुन या सदंर्भात माहिती देत काही काळ सर्व दुकाने सुुरु ठेण्याबाबत आग्रही भूमिका घेतली. या जिल्हाधिकार्यांनी तोंडी होकार दर्शवला. यामुळे आजपासून दुकाने सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
या वेळी नगराध्यक्ष करण पवार, उपनगराध्यक्ष मंगेश तांबे, आरोग्य सभापती दीपक अनुष्ठान यांच्यासह नगरसेवक मनीष पाटील, बापू महाजन, प्रकाश महाजन, संजय पाटील, सुधाकर पाटील, पी. जी. पाटील, प्रकाश वाणी, धीरज महाजन, प्रवीण बडगुजर आणि व्यावसायिकांची उपस्थिती होती.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००