पारोळा प्रतिनिधी । राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त पंचायत समितीत बाल विकास प्रकल्प कार्यालयातर्फे स्वाक्षरी मोहीमेस पं.स.सभापती रेखाबाई भिल यांच्याहस्ते सुरुवात करण्यात आली.
यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ आनुषंगिक शपथ देखील घेण्यात आली. यावेळी पं.स. सदस्य ज्ञानेश्वर पाटील, प्रमोद जाधव, सरपंच राजेंद्र पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी अहिरे, बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री वारुळे आदींची उपस्थिती होती.
महिला व बाल विकास मंत्रालय भारत सरकार दिल्ली संयुक्त सचिव बेटी बचाओ बेटी पढाओ आस्था खटवणी यांनी 24 जानेवारी हा राष्ट्रीय बालिका दिन निमित्ताने जळगाव जिल्ह्यात 20 ते 26 जानेवारी राष्ट्रीय बालिका सप्ताह म्हणून पाळवा अश्या सूचना केल्या आहेत. या अभियाना अंतर्गत ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या बाबत विविध उपक्रमातून जनजागृती करून गावा गावात त्याच्या अनुषंगाने अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक शाळा, या ठिकाणी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्याच धर्तीवर तालुक्यात आज औचित्य साधून या मोहिमेस सुरुवात करण्यात आली. यावेळी पंचायत समिती कार्यालय अधीक्षक श्री निंबाळकर, कारकून शालिग्राम बडगुजर यांच्यासह इतर अधिकारी सह पदाधिकारी उपस्थित होते.