पारोळ्यातील भाजीपाला मार्केटसह आठवडे बाजार आज बंद

पारोळा प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडॉनमुळे येथील रविवारचा आठवडे बाजार व भाजीपाला मार्केट आज बंद ठेवण्याचा निर्णय मुख्याधिकारी विजयकुमार मुंडे यांनी घेतला आहे. तश्या सूचना त्यांनी भाजीपाला लिलाव प्रसंगी शेतकरी, विक्रते यांना दिल्या आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फक्त रविवारचा आठवडे बाजारच हा बंद ठेवण्यात येत होता. आता मात्र त्यांनी रविवार भाजीपाला मार्केट ही बंद ठेवल्याने सलग दोन दिवस भाजीपाला लिलाव बंद राहणार आहे. त्यामुळे दोन दिवस ताजा भाजीपाला शहर वासीयांना मिळणार नसल्याने त्याचा दोन दिवस तुटवडा निर्माण होणार आहे. सध्या हायस्कूलच्या मैदानावर भाजीपाला लिलाव हे होत आहेत. या ठिकाणी सोशल डिस्टन्स पाळण्याचा प्रयत्न केले जात आहे. जिल्हाधिकाऱ्यानी यापूर्वी च आठवडे बाजार बंद ठेवण्याचे जाहीर केल्याने उद्याचा रविवार हा तालुक्याचा आठवडे बाजार हा बंद राहणार आहे. परंतु रविवारी भाजीपाला मार्केट ही बंदचा निर्णय मुख्याधिकारी मुंडे यांनी घेतला आहे. दर सोमवार हा भाजीपाला मार्केटचा पूर्वीपासूनचा वार आहे. सलग दोन दिवस भाजीपाला मार्केट बंद मुळे शेतकऱ्यांपुढे चिंता निर्माण झाली आहे. शहराला देखील रोज ताजा भाजीपाला घेण्याची व खाण्याची सवय असल्याने आता दोन दिवस या बंदमुळे त्यांना ताजा भाजीपाला पासून मुकावे लागणार आहे.

 

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content