पारोळा, प्रतिनिधी । येथील व्यापारी असोसिएशन, नगराध्यक्ष, नगरसेवक यांच्यातर्फे शहरातील भाजीपाला विक्रेते, कापड विक्रेता, मेडिकल, हार्डवेअर दुकानदार, पेपर वाटप करणारे यांच्यासाठी सॅनिटायझर, मास्क,मोठ्या प्रमाणात देण्यात आले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मास्क व सॅनिटायझरचा वापर करण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. यात दुकानावर विना मास्क ग्राहक आल्यास त्याला सुध्दा मास्क देण्यात याव्यात अशा सूचना नागराध्यक्ष करण पवार, नागरसेवक व व्यापारी असोसिएशनतर्फे देण्यात आल्या. विशेष करून भाजीपाला विक्रेत्यांसाठी हॅन्ड ग्लोजचे वाटप करण्यात आले. यावेळी आरोग्य सभापती दीपक अनुष्ठान, नगरसेवक पी. जी. पाटील , प्रकाश शिरोळे, भैय्या चौधरी, प्रकाश महाजन, गौरव बडगुजर, अमोल चौधरी, धीरज महाजन, कैलास पाटील तसेच, केशवशेठ क्षत्रिय, विलास वाणी, बंडू नाना, अशोक ललवाणी यांचा सह पत्रकार रावसाहेब भोसले, योगेश पाटील, रमेश कुमार जैन, संजय पाटील, दीपक भावसार उपस्थित होते. नगराध्यक्ष करण पवार यांनी या तालुक्याच्या नागरिकांना घरातच राहा सुरक्षित रहा असे आवाहन करण्यात आले आहे.