पारोळा प्रतिनिधी । आमदार चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नाने पारोळा येथे शेतकरी संघात शासकीय मका, ज्वारी खरेदीला परवानगी मिळाली असून त्यांच्या हस्ते काटा पूजन करून याला प्रारंभ करण्यात आला.
पारोळा येथील शासकीय गोदामात फिजीकल डिस्टन्सींगचे पालन करून मका व ज्वारी खरेदीचा शुभारंभ आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी उपस्थित सुभाष पाटील या शेतकर्याची ज्वारी खरेदी करण्यात आली. यावेळी आमदार चिमणराव पाटील म्हणाले की, एकही शेतकरी आपला माल विक्रीपासून वंचित राहणार नाही याची प्रशासनाने काळजी घ्यावी. तसेच शासनाने बाजरी खरेदी करावी यासाठी मुख्यमंत्री, कृषिमंत्री, जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवले व मागणी केली आहे त्यामुळे लवकरात लवकर शासकीय बाजरी खरेदी होईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
याप्रसंगी तहसीलदार अनिल गवांदे, चतुर पाटील,शेतकरी संघ चेअरमन डॉ राजेंद्र पाटील, व्हाईस चेअरमन भिकन महाजन,पंचायत समिती सभापती रेखाताई भिल, बीडीओ मंजुश्री गायकवाड, जि.प. सदस्य डॉ हर्षल माने, तालुका प्रमुख प्रा आर. बी. पाटील, शहर प्रमुख अशोक मराठे, बाजार समिती उपसभापती डॉ पी. के.पाटील, मधुकर पाटील, पंचायत समिती सदस्य जितेंद्र पाटील, भिडू जाधव, शेतकरी संघ संचालक सखाराम चौधरी, चेतन पाटील, नाना श्रवण पाटील, दाजभाऊ पाटील, विस्तार अधिकारी सुनील पाटील, राजू कासार बाजार समिती सचिव रमेश चौधरी, शेतकरी संघ सचिव भरत पाटील, शंतनू पाटील आदी उपस्थित होते.