Home धर्म-समाज पारोळा येथे उद्या रक्तदान शिबीराचे आयोजन

पारोळा येथे उद्या रक्तदान शिबीराचे आयोजन


पारोळा प्रतिनिधी । साईबाबा परीवार, पत्रकार संघ आणि सामाजिक संस्थेच्या वतीने उद्या २ एप्रिल रोजी सोनार मंगल कार्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

कोरोना विषाणूचा राज्यात फैलाव वाढत आहे. त्या दृष्टीकोनातून भविष्यात रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी शहरातील साईबाबा परिवार, पत्रकार संघ व इतर सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विदयमानाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील रक्तदान उद्या २ एप्रिल रोजी रामनवमीचे औचित्य साधून शहरातील सोनार मंगल कार्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे. तरी शहरातील सर्व रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

 

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
फेसबुक पेज : https://bit.ly/2QSCeHB

युट्यूब पेज : https://bit.ly/2UuRmx3


Protected Content

Play sound