Home Cities पारोळा पारोळा येथील श्री शिवाजी गणेश मित्र मंडळाच्या अध्यक्षपदी छोटू वाणी

पारोळा येथील श्री शिवाजी गणेश मित्र मंडळाच्या अध्यक्षपदी छोटू वाणी


पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील आझाद चौक येथे श्री शिवाजी गणेश मित्र मंडळाच्या झालेल्या बैठकीत कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात अध्यक्षपदी छोटू वाणी यांची निवड करण्यात आली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, श्री शिवाजी गणेश मित्र मंडळाची शनीवारी १३ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता श्री शिवाजी गणेश मंडळाची मीटिंग घेण्यात आली त्या ठिकाणी सर्व सभासदांच्या एकमताने कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात श्री शिवाजी गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी छोटू वाणी यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी मनोज भाऊ चौधरी व योगेश चौधरी व खजिनदार गिरीश चौधरी व प्रसाद चौधरी व सचिवपदी जगदीश चौधरी व भोला चौधरी यांची निवड करण्यात आली. व मिटींगचे सर्व सूत्रसंचालन विकास चौधरी यांनी केले.


Protected Content

Play sound