पारोळा प्रतिनिधी । आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मानवंतराव साळुंखे यांनी आपली सामाजिक बांधिलकी जोपासत आज आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवसी नगरपालिकेत जावून मालमत्ता आणि पाणीपट्टी कर भरून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
आदर्श शिक्षक मानवंतराव साळुंखे यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी मुख्याधिकारी विजयकुमार मुंडे, आरोग्य सभापती दिपक अनुष्ठाण, कर निरीक्षक संदिप साळुंखे, किशोर उमप वसुली लिपिक यांच्या उपस्थितीत हा कर जमा केला आहे. त्यांनी गेल्या तीस वर्षात वेळेवर कर भरण्याची परंपरा त्यांच्या वडीलांपासुन आजही त्यांनी अबाधित ठेवली.
स्वच्छता पाहणी अभियानात उत्कृष्ट कार्याचे सन्मानपत्र या आगोदर देण्यात आले आहे. या स्तुत्य कृतीचे शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पाटील, उपनगराध्यक्षा सुनिता वाणी, राज्य शिक्षक स.ध. भावसार, पारोळा तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष गुणवंतराव पाटील यांनी हार्दिक अभिनंदन केले.
यावेळी प्रतिक्रिया देतांना साळुंखे म्हणाले आपण शाळेत असतांना नागरिक शास्त्र शिकतो. त्यात मानवी हक्क व कर्तव्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे कार्य व काम अभ्यासतो. बऱ्याचदा आपण हक्कांबाबत जागृती दाखवितो पण कर्तव्य मात्र विसरतो. या संस्था आपल्याला पथदिवे, पाणी, गटारी, रस्ते, आरोग्य, स्वच्छता, अग्नीशमन अशा विविध सुविधा पुरवितात. या संस्थांना शासकिय अनुदानाबरोबर आपल्या हद्दीत निवास करणाऱ्या नागरिकांकडुन मालमत्ता व पाणीपट्टी कर गोळा करून आपले प्रशासन चालवावे लागते. शासकिय मदत वेळेवरच व पुरेशी मिळेल असे नाही म्हणुन या सुविधा आपल्याला नियमित व वेळेवर मिळण्यासाठी आपण आपल्याला आकरलेला कर लवकरात लवकर भरणे गरजेचे व महत्वाचे आहे. असे करून आपण स्वतःला व आपल्या बांधवांनाच एक प्रकारे मदत करतो . सध्या कोरोना मुळे नगर पालिका व शासनावर ताण व बोजा अधिकचा पडत आहे म्हणुन सर्व शहरवासियांना विनंती की आपल्याकडे नगर पालिकेची मागिल थकबाकी असेल ती व या आर्थिक वर्षाचा कर शक्य तेवढया लवकर भरणा करून पालिकेला अधिक जोमाने विकास कामे करण्यासाठी मदत करावी .
जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००