Home क्राईम पारोळा पोलिसांनी शिताफीने पकडले मोटार सायकल चोर

पारोळा पोलिसांनी शिताफीने पकडले मोटार सायकल चोर

0
153

पारोळा प्रतिनिधी | पारोळा पोलिसांनी दोघा मोटर सायकल चोरला पकडून त्याच्याकडील चोरीची ४ मोटार सायकली जप्त केल्या आहेत. त्या  दोघांना पुढील चौकशीसाठी धरणगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

 

पारोळा पोलीस स्टेशनचे पोहेकाँ  महेश पाटील, पोहेकाँ सत्यवान पवार, पोना सुनिल सांळुखे, पोकाँ किशोर भोई, पोका दिपक अहिरे, असे गावात पेट्रोलींग करीत असतांना पोलीस निरिक्षक संतोष भंडारे यांचे मार्गदर्शनाखाली गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, निलेश मराठे (वय २२ वर्षे रा. भोसले गल्ली पारोळा) यांचेकडे चोरीची मोटार सायकल आहे. त्यास धरणगाव बायपास येथे पकडले असता त्याच्या ताब्यातील मोटार सायकलच्या कागदपत्रांची चौकशी केली असता तो उडवाउडविचे उत्तरे देवु लागला. त्यास पारोळा पोलीस स्टेशनला आणले असता सदर मोटार सायकल चोरीची आहे असे त्याने कबुल केल्याने व सोबत ज्ञानेश्वर पाटील( रा. राजीव गांधी नगर पारोळा) असे मिळुन आम्ही अजुन तीन मोटार सायकल चोरी केल्याचे कबुल केले. ज्ञानेश्वर पाटील याने अशा चार ठिकाणी मोटार सायकल चोरी केल्याचे कबुल केले आहे. त्यांनी  धरणगाव,  चोपडा,  निपाणे अशा ठिकांणाहुन चोरी केल्याचे सांगितल्याने त्यांना धरणगाव पोलीस स्टेशन गुरु न. ३५१/२०२१ भा.द.वी. कलम ३७९ मधील गुन्ह्याचे चौकशी कामी ताब्यत देण्यात आले.


Protected Content

Play sound