पारंपरिक रूढीला फाटा देत आदर्श विवाह

भुसावळ- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।सदरचा विवाह  चंदन निकम व भारतीय बौद्ध महासभा चे केंद्रीय शिक्षक प्रकाश सरदार याच्या पुढाकारने जळगाव ची वधू सुरेखा विलास सुरळके व रावेर तालुक्यातील नेहेता येथील वर शुभम दिलीप साळवे यांच्या मध्ये निंभोरा येथील त्रिरत्न बुद्ध विहारात बोद्धचार्य एस. पी. जोहरे यांच्या हस्ते पार पडला.यावेळी अरुण भालेराव, राहुल वाघ,मनोहर दांडेकर, कैलास सुरळके,रोशन सुरळके, तरुण गवई, प्रणव मेश्राम,निखिल मेश्राम, विशाल मेश्राम इत्यादी मोजक्या पाहुण्या समक्ष चहा पाण्यावर याच्या प्रमुख उपस्थित विवाह संपन्न झाला.

या वेळी प्रकाश सरदार यांनी वर-वधूला आशीर्वाद देत “अशी विवाह होणे ही काळाची गरज आहे. वधू व वर दोन्ही पाहुणे मंडळी चे कौतुक केले.”

Protected Content