सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । सुरत येथून आपल्या गावाकडे पायी जाणार्या तरूणांची सावदा नगर परिषदेतर्फे निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
सुरत येथून ३२ तरुण हाताला काम नसल्याने पायी चालत घरी निघाले होते. सावदा नगरपरिषद कर्मचारी यांच्या ही बाब लक्षात आणून दिल्या नंतर त्या तरुणांच्या राहण्याची तसेच जेवणाची सोय नगरपरिषद बहुद्देशीय सभागृहात करण्यात आली आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी सावदा ग्रामीण रुग्णालय येथील डॉक्टरांकडून करण्यात आली. त्यांची चांगल्या प्रकारे राहण्याची व जेवणाची सोय होईल याची खबरदारी नगरपरिषद कर्मचारी संदीप पाटील, सचिन चोलके, विजय चौधरी, राजेंद्र मोरे यांच्यामार्फत घेण्यात आली आहे.