चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील पातोंडा येथे वाघळी-पातोंडा गटातील विविध विकास कामांचे भूमिपूजन आज आमदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी जि.प. सभापती पोपट भोळे, पं.स. उपसभापती संजय पाटील, सदस्य सुभाष पैलवान व पातोंडा मुंदखेडे सरपंच, उपसरपंच, विकासो चेअरमन, व्हा. चेअरमन व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या विकास कामांमध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत पातोंडा ते मुंदखेडे रस्ता, पातोंडा येथे प्रा आ केंद्र – कब्रस्थानकडे जाणारा रस्ता काँक्रीटीकरण करणे, पातोंडा ते खरजई रस्ता डांबरीकरण करणे, वाकडी ते मुंदखेडे रस्ता डांबरीकरण करणे, पातोंडा येथे महिला व पुरुषांसाठी सार्वजनिक स्वछतागृह बांधणे, बोरखेडा खु येथील स्मशानभूमी सुशोभीकरण करणे आदी कामांचा समावेश आहे.