अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील पातोंडा येथील न्यू प्लॉट भागांतील तरुण कपिल अनिल जाधव (वय-20 वर्षे) हा रविवार सकाळ पासून बेपत्ता झाला आहे. याबाबत अमळनेर पोलीसात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अनिल जाधव हा आपल्या आईवडीलांसह वास्तव्याला आहे. शेतमजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. घरात अठराविश्व दारिद्र्य, मोठ्या भावाचे आकस्मिक निधन झालेलं तरीही मोलमजुरी करून संसाराचा गाडा चालला होता. रविवारी १९ सप्टेंबर रोजी सकाळी मी गाई बघून येतो हे सांगून तो घराबाहेर पडला. संध्याकाळी झाली तरीही तो परतला नाही. म्हणून आई-वडील चिंतेत पडले व त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला. परंतू तो मिळून आला नाही. त्याच्याकडे मोबाईल वगैरे नसल्याने त्याच्याशी संपर्क होत नव्हता. दोन दिवसांपासून हरिष लाड, प्रविण लाड ह्या भावंडांनी परिसरातील गावे पिंजून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्याची कुठेही माहितीही मिळाली नाही. त्याच्या बेपत्ता होण्याची नोंद अमळनेर पोलीस स्थानकात करण्यात आली असून त्याचा शोध सुरू आहे. तरीही कुणाला त्याच्या बाबतीत माहिती मिळाल्यास किंवा तो आढळून आल्यास 8830843220,8999818154 ह्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचा त्याच्या कुटुंबीयांनी मागणी केलीय.