Home Cities एरंडोल पातरखेडे येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या

पातरखेडे येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या

0
28

एरंडोल प्रतिनिधी । तालुक्यातील पातरखेडे येथे कांतीलाल मच्छींद्र पाटील ( वय-४२ वर्षे ) यांनी स्वत:च्या राहत्या घरी एकटे असतांना गुरूवारी दुपारी घराच्या छताच्या कडीला दोरीचा गळफास लावुन आत्महत्या केली.

या घटनेबाबत एरंडोल पोलिस स्टेशन ला अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास विकास देशमुख, राजु पाटील,अमीत तडवी व अकील मुजावर हे करीत आहेत. दरम्यान, कांतीलाल पाटील यांनी नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.


Protected Content

Play sound