जळगाव , लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | सुप्रीम कॉलनी परिसरातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने आज महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते अमृत योजनेच्या फेज २ अंतर्गत नवीन पाईप लाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी जेष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा, नगरसेवक, गणेश सोनवणे, नगसेविका नीता सोनवणे, चंद्रकांत भापसे आदी उपस्थित होते.
प्रभाग क्र. १९ मधील शहरातील उंच असा भाग असलेल्या सुप्रीम कॉलनी परिसरात अनेक वर्षांपासून महापालिकेच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत होता. परंतु तो तोकडा पडत असल्याने एका वर्षापूर्वी या भागात अमृतच्या जलवाहिनीचे उद्घाटन झाले होते. मात्र, यातून बऱ्याचश्या भागांना समाधानकारक पाणीपुरवठा होत नव्हता. यातच वाढीव विस्तारित भागात नळ कनेक्शन देण्यात आलेले नव्हते. याबाबत स्थानिक नगरसेवक चंद्रकांत भापसे, गणेश सोनवणे, नगसेविका नीता सोनवणे यांनी याबाबत महापौर जयश्री महाजन यांच्याकडे सातत्याने पाठपुरवा केला होता. मात्र, यात काही तांत्रिक अडचणी उद्भवल्या होत्या. यासोबत काही विषयांना राज्य शासनाकडून मजुरी मिळणे आवश्यक होते. यासंदर्भातील मंजुरी राज्य शासनाने दोन दिवसांपूर्वी दिली आहे. यामुळे या भागातील नागरिकांची समस्या सोडवण्याच्या दृष्टीने सव्वा दोनशे मिलिमीटर व्यासाची एक नवीन पाईप लाईन टाकण्याचा शुभारंभ आज करण्यात आल्या असल्याची माहिती जेष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी दिली. प्रभाग क्र. १९ मधील सुप्रीम कॉलनी परिसरात या पूर्वी कमी प्रमाणत पाणीपुरवठा होत होता, तो सुसह्य होण्यासोबतच या परिसरातील वाढीब भाग काझी नगर, सिद्धार्थ नगर असे नवीन विस्तारती योजनेतील भागांना नवीन पाईप टाकून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा एक महत्वकांक्षी निर्णय मार्गी लागला आहे. गरीब व संमिश्र वस्तीचा भाग असल्याने त्यांना कामावर जावे की पाण्यासाठी भटकंती करावी अशा समस्येला तोंड द्यावे लागत होते. आता त्यांच्या पाण्याची समस्या सुटली आहे. महापौर जयश्री महाजन यांनी नवीन पाईप लाईन टाकण्याच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी सांगितले की, सुप्रीम कॉलनी प्रभाग क्र. १९ पाण्यापासून बऱ्याच वर्षापासून वंचित राहिलेला भाग आहे. या भागात काही ठिकाणी अमृत योजना फेज १ अंतर्गत नळ कनेक्शन देण्यात आलेले आहेत. मात्र, काही घरांना सुरळीत पाणीपुरवठा होत नव्हता फेज २ वाढीव भागातील घरांना अमृत योजनेअंतर्गत पाणीपुरवठा होणार आहे.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1189082455253198