जळगाव (प्रतिनिधी) शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून कांचनगर परिसरातील अनेक कॉलन्यामध्ये देखील कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. या संदर्भात पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, कर्मचारी दखल घेत नसल्याचे निवेदन नगरसेविका कांचन सोनवणे यांनी आयुक्तांना आज दिले
जळगाव शहरात गेल्या दिड दोन महिन्यापासून पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यात अनेक ठिकाणी पाणीपुरवठा कमी दाबाने होत असल्याने नागरिकांना पुरेसा पाणी मिळत नसल्याने भर उन्हात पाणी शोधण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यात कांचननगर परिसरातील पराग किराणा परिसर, स्वामी नारायण मंदिर, शिवशंकर नगर, हरि ओम नगर या परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा येत आहे. याबाबत पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी कर्मचारी दखल घेत नाही आहे. तसेच तीन ते चार ठिकाणी व्हॉल बसविणे व कांचनगर परिसरातील दर्ग्याजवळील विहीर, भैय्या वखार जवळील विहीर, हरिओम नगर आसोदारोड परिसरातील विहिरी पुर्नजिवीत करून जलसंकट दुर करावे असे पत्र आयुक्तांना नगरसेविका सोनवणे यांनी दिले.