एरंडोल प्रतिनिधी । तालुक्यातील वनकोठे बांभोरी गृप ग्रामपंचायतीने पाणीपट्टी कमी करावी म्हणून ग्रामस्थांचे साकळे, वनकोठे येथील ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांनी गेल्या ५-६ महिन्यांपासून १६ गावांचा पाणीपुरवठा योजनेचे पाणी प्यायला न मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
१६ गाव पाणीपुरवठा योजनेचे वीजबिल थकबाकी झाल्याने १६ पाणीपुरवठा खंडित झाला आहे. खुद्द वनकोठे-बांभोरी गृप ग्रामपंचायतिचे लोकनियुक्त सरपंच उमेश पाटील हे १६ गांव पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष आहेत. यात वनकोठे, तळई, अंतुर्ली, आडगाव जवखेडे सिम व कासोदा हे ही गाव समाविष्ट होते. येथील सरपंच १६ गांव पाणीपुरवठा योजनेत सदस्य आहेत , या गावातील ग्रामपंचायती १६ गाव पाणीपुरवठा योजनेने पाणी गावाला पुरवित असतात. परंतु इतर गावांनी आपल्या गावासाठी धरणावरून स्वतंत्र पाईपलाईन केल्याने ती गावे या योजनेतून वगळली गेली आहेत. त्यामुळे या योजनेचा संपूर्ण भार केवळ दोन ते तीन गावांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे येणारे भरमसाठ लाईटबील या पंचायतींना वसुली अभावी न परवडणारे आहे. म्हणून सद्यास्थितीत सरपंचांनी विजबिल न भरल्याने १६ गाव पाणीपुरवठा योजना बंद आहे.
गावकऱ्यांना येथील प्रथम सरपंच कै.जी.डी. वाघ यांनी राबविलेल्या विहीर व ट्युबवेल वरून केलेल्या पाईपलाईन द्वारेच पाणी पुरवठा केला जात आहे. कै.जी.डी. वाघ यांनी ५५ वर्षापूर्वी ही पाईपलाईन सरपंच असतांना करून दिली होती. त्याचाच वापर करून आजही पाणीपुरवठा होत आहे. कै.जी.डी. वाघ यांनी सरपंच असतांनाच १६ गाव पाणि पुरवठा योजनेत वनकोठे व बांभोरी हे गाव सहभागी करून घेतले होते. म्हणून गाव विहिरीतुन पाणी पुरवठा कमीत कमी दोन दिवसांनी व्हावा व पाणी पट्टी कमी करून पहिल्या सारखी ७०० रुपये वसूल करावी. या मागणीला सर्वच स्तरावरून जोर धरत आहे. यासाठी सरपंचांनी लक्ष द्यावे व ७०० रुपये पाणी पट्टी करावी असे एका पत्रकांन्वे सांगण्यात येत आहे.