पाडळसे ग्रामपंचायतीतर्फे अंगणवाडी सेविकांचा उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल गौरव

यावल प्रतिनिधी । कोरोना विषाणूच्या प्रतिकारासाठी मोलाची कामगिरी बजावणार्‍या अंगणवाडी सेविकांचा तालुक्यातील पाडळसे येतील ग्रामपंचायतीतर्फे सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

कोरोनाचा प्रसार व प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन लावण्यात आले असून या संकटमय प्रसंगी नागरिकांच्या सुरक्षा विषयाला घेऊन महसूल प्रशासन आपले घेऊन धोक्यात घालून अहोरात्र परिश्रम घेत आहे. या अनुषंगाने १४७ बाहेरगावाहून आलेली नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात आलेले असून त्यांची प्रतिदिन आरोग्य तपासणी करून तसा अहवाल ही अंगणवाडी सेविका आरोग्य विभागाकडे सादर करीत आहेत. यामुळे पाडळसे ग्रामपंचायत च्या कार्यक्षेत्रात फैजपूर विभागाचे प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांच्या कल्पनेतून कोरोना साथीच्या आजाराला प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी जनजागृती च्या माध्यमातून विशेष व नाविन्यपूर्ण अशी कार्य केल्याबद्दल या परिसरातील अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर व त्याचबरोबर पाडळसे ग्रामपंचायतीचे कर्मचारी तसेच संगणकीय ऑपरेटर यांनी या संकटप्रसंगी अभिमानास्पद व उत्कृष्टकार्य केल्याबद्दल पत्र प्रदान केले. पाडळसे ग्रामपंचायतीचे सरपंच ज्ञानेश्‍वर दांडगे कोरोना समितीचे सचिव गावातील पोलीस पाटील सुरेश खैरनार, पाडळसे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी लीलाधर सोना नहाले आदींची उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालय मध्ये त्यांनाही उत्कृष्ट कार्य केल्याचे पत्र प्रदान करण्यात आले.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content