यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील पाडळसे ग्रामपंचायत १४ वित्त आयोग पंधरावी वित्त आयोगातील झालेल्या विविध कामांची चौकशी व्हावी, या मागणीचे निवेदन ग्रामस्थांनी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया यांच्याकडे दिले आहे.
या संदर्भात दिलेल्या निवेदनात पाडळसे ग्रामपंचायत मार्फत २०१७ ते २०२१ या कार्यकाळात १४ वा वित्त आयोग व १५ व्या वित्त आयोगातून झालेल्या गावातील विविध विकास कामांची चौकशी व्हावी यात पोलीस प्रशिक्षण शिबिर ,आरोग्य शिबिर, महिला बाल विकास अंगणवाडी दुरुस्ती, महिलांसाठी शौचालय इत्यादी झालेल्या कामांची तात्काळ चौकशी व्हावी याबाबतचे निवेदन पाडळसा ग्रामस्थांमार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांना देण्यात आले.
यावेळी उपस्थित ग्रामस्थांमध्ये भरत चौधरी, रमेश भोई, नामदेव कोळी, पांडुरंग कोळी ,प्रशांत तायडे ,समाधान कोळी, सुरज कोळी, कुंदन कोळी, संजय कोळी, छोटू बाविस्कर, सैय्यद रज्जाक टकारी इत्यादी ग्रामस्थ बांधव मोठया संख्येत उपस्थित होते.