पाडळसरे येथे विकास कामांचे भूमिपूजन

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तापी नदीवरील पाडळसरे धरणामुळे विस्थापित झालेल्या नवीन पुनर्वसित गावात पाणी पुरवठा योजना, अंगणवाडी, रस्ता व मुख्य गाव दरवाजा असे ३ कोटी रुपयांचा निधीची तरतूद असलेल्या विकास कामांचे आ. अनिल पाटील व सरपंच शुभांगी पाटील यांच्या यांच्याहस्ते कुदळ मारून भूमिपूजन करण्यात आले.

 

विस्थापित पाडळसरे गावी पाणी टंचाई दूर करण्यासाठी व कळमसरे ते पाडळसरे धरणापर्यंत अवजड वाहने वापरून खराब झालेल्या मुख्य रस्त्यासाठी ग्रामपंचायतकडून झालेल्या मागणीनुसार जलजीवन मिशन अंतर्गत १ कोटी ७ लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना तर १ कोटी ५० लाख रुपयांचा कळमसरे ते पाडळसरे धरणापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण व मजबूतिकरन करणे , अद्ययावत अंगवाडी बांधकामासाठी ८ लक्ष ५० हजार रुपये , गाव अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी १० लाख रुपये, मुख्य रस्त्यावर गाव दरवाजासाठी ८ लाख रुपये, एक किलोमीटर पानंद रस्तासाठी ७ लक्ष रुपये असा एकूण तीन कोटी रुपयांची विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

 

यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील ,सरपंच शुभांगी पाटील, उपसरपंच शिवाजी अण्णा पाटील, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर पाटील ,प्रकाश भदाणे, दिलभर भिल , ग्रामपंचायत सदस्या कविता पाटील, भारती कोळी, अक्काबाई भिल, वच्छाबाई भिल, माजी सरपंच सचिन पाटील, शांतता समितीचे सदस्य पत्रकार सदस्य वसंतराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा क्षेत्र प्रमुख भागवत पाटील, देखरेख संघाचे माजी अध्यक्ष पिंटू राजपूत, राष्ट्रवादी विद्यार्थी सेलचे तालुकाध्यक्ष भूषण पाटील ,राष्ट्रवादी किसान सेलचे माजी तालुकाध्यक्ष विकास पाटील ,हभप गोकुळ पाटील, विकास सोसायटीचे चेअरमन मंगल पाटील, व्हाईस चेअरमन शत्रुघ्न पाटील ,संजय पाटील ,राजेंद्र पाटील ,रामकृष्ण पाटील ,जगदीश भदाणे ,माजी उपसरपंच रवींद्र पाटील ,सचिन कोळी ,संदीप पाटील ,चंद्रकांत पाटील ,हरिष पाटील ,रामसिंग कोळी ,डॉक्टर अविनाश पाटील  ,ईश्वर गुर्जर  ,मनोज पाटील ,समाधान गुर्जर ,जयसिंग कोळी ,मंगल गुर्जर ,समाधान पाटील ,मधुकर गुर्जर, बापू अहिरे ,ग्रामसेवक सुभाष भोई ग्रामपंचायत कर्मचारी गोपाल कोळी , सुखदेव कोळी आदींची विशेष उपस्थिती होती , कार्यक्रमात भागवत पाटील यांनी प्रस्तावित व सूत्रसंचालन केले तर संजय पाटील व सचिन पाटील यांनी आभार व्यक्त केले

Protected Content