पाचोऱ्यात विनामुल्य मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बुधवार ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी परिसरातील नागरिकांसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकानजीक असलेल्या शिवतिर्थ कार्यालयात विनामुल्य मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिराचे उद्घाटन वैशाली सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख अरुण पाटील, माजी जि. प. सदस्य उद्धव मराठे, तालुका प्रमुख रमेश बाफना, युवासेना उपजिल्हाप्रमुख संदिप जैन, संतोष पाटील उपस्थित होते. सकाळी १० वाजता सुरू झालेल्या या शिबिरात परिसरात असंख्य रुग्ण आपल्या डोळ्यांची तपासणी करून घेत आहेत. शिबिर यशस्वीतेसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, युवासेना, महिला आघाडी चे पदाधिकारी व कार्यकर्ते अथक परिश्रम घेत आहेत.

Protected Content