पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जळगाव जिल्हा परिषद प्रशासनाच्या आदेशानुसार पाचोरा पंचायत समितीने तालुकास्तरिय हिवाळी मैदानी क्रीडा स्पर्धेचे आयोजन गटविकास अधिकारी अतुल पाटील, गटशिक्षणाधिकारी नरेंद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा येथील मुरलीधरजी मानसिंगका महाविद्यालयाच्या मैदानावर शनिवारी व रविवारी स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेचे उद्घाटन गटविकास अधिकारी अतुल पाटील यांच्या हस्ते झाले.
दोन दिवस चाललेल्या क्रिकेट, बुद्धिबळ, बॅडमिंटन, हॉलीबॉल स्पर्धेत शिक्षण विभागाने बाजी मारली तर बुद्धीबळ व बॅडमिंटन यात गटविकास अधिकारी अतुल पाटील यांनी आपले वर्चस्व दाखविले. मैदानी क्रीडा स्पर्धेत क्रिकेट स्पर्धेत पाचोरा टिचर्स टिम (प्रथम), ग्रामसेवक संघटना (द्वितीय), बुद्धिबळ स्पर्धेत शिक्षक संदिप बुधवंते (प्रथम), गटविकास अधिकारी अतुल पाटील (द्वितीय), बॅडमिंटन पुरुष एकेरी स्पर्धेत अभियंता चंद्रकांत वाडीले (प्रथम), गटविकास अधिकारी अतुल पाटील (द्वितीय), ग्रामसेवक संजय चौधरी (तृतीय), पुरुष स्पर्धेत ग्रामसेवक नितीन बोरसे (प्रथम), संजय चौधरी (द्वितीय), महिला एकेरी स्पर्धेत सरोज मगर (प्रथम), प्रिती व मिनाक्षी (द्वितीय) यांनी क्रमांक पटकावला आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संजय देवकर, सहाय्यक गटविकास अधिकारी एम. एस. भालेराव, ए. पी. बागुल, अमोल पाटील, विस्तार अधिकारी दिलीप सुरवाडे, राजकुमार धस, सुनील पाटील, विजय सावळे यांनी सहकार्य केले.