पाचोऱ्यातील नवकार प्लाझा मधील रेडिमेड कापड दुकानात आगीचा तांडव

पाचोरा, प्रतिनिधी | शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नवकार प्लाझा या शाॅपिंग काॅम्प्लेक्स मधील एका रेडिमेड कापड दुकानाला मध्यरात्रीच्या वेळी शाॅर्ट सक्रिटमुळे भिषण आग लागल्याची घटना घडली. यात सुदैवाने कुठलीही जिवीत हानी झाली नसुन मात्र आगीत सुमारे १४ ते १५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. या घटनेबाबत पाचोरा पोलिसात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.

 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाचोरा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नवकार प्लाझा या शाॅपिंग काॅम्प्लेक्सच्या ग्राउंड फ्लोअरमध्ये भुषण पाटील यांचे पूर्वा फॅशन कलेक्शन रेडीमेड कापड (दुकान क्रमांक – २०) आहे. भुषण पाटील हे आपले दैनंदिन काम आटोपून दि. ३१ जानेवारीच्या रात्री ९ वाजेच्या सुमारास दुकानाचे शटर बंद करुन घरी गेले असता मध्यरात्री रात्री ११:३० ते १२ वाजेच्या दरम्यान शाॅर्ट सक्रिटमुळे अचानक दुकानाला आग लागली. सदरचा प्रकार काही अंतरावर असलेल्या अंकुर हॉस्पिटल मधील रुग्णांच्या नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी आरडा ओरड सुरू केली. आग लागलेल्या पूर्वा फॅशन कलेक्शनच्या बाजुच्या सागर कुशन दुकानाच्या बोर्डवर भ्रमणध्वनी क्रमांक असल्याने सागर कुशनचे मालक सागर पाटील त्यांना कळविण्यात आले. सागर पाटील हे तात्काळ घटनास्थळी आले असता त्यांनी सर्व प्रथम अग्निशमन दलास पाचारण करुन आजु बाजुच्या दुकानदारांना बोलावुन घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, अग्निशमन दलाचे कर्मचारी बंबासह दाखल झाल्यानंतर सदरची लागलेली आग शमविण्यात आली. यावेळी भा.ज.पा. चे मा. शहराध्यक्ष नंदू सोमवंशी, पृथ्वी गिफ्टचे मालक गोडसे, पत्रकार संजय पाटील, जेनेरिक मेडिकलचे मालक यघ्नेश कासार, भारती एग्रोचे मालक जगदीश पाटील यांनी अग्निशमन दलास मदत केली. सुमारे एक तास मेहनत घेऊन आग विझविण्यात आली.

Protected Content