पाचोऱ्याचा चहा विक्रेता झाला मुंबईचा फौजदार

पाचोरा, प्रतिनिधी ।  शहरात मध्यवर्ती ठिकाणी साधी चहाची टपरी चालक वाल्मिक एकनाथ महाजन यांनी परिस्थितीवर मात करत महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एम. पी. एस. सी.) परीक्षेत ४०० पैकी ३५१ गुण मिळवून ४० व्या रँकने  उत्तीर्ण होऊन यश संपादन करत पोलिस उपनिरीक्षक पद मिळविले आहे. 

वाल्मिक महाजन यांनी उत्तुंग यश संपादन केल्यामुळे त्यांचा भव्य सत्कार धुळे जिल्हा व जळगाव जिल्हा खान्देश माळी महासंघातर्फे करण्यात आला. याप्रसंगी खान्देश माळी महासंघचे धुळे जिल्हाअध्यक्ष प्रा. अनिल बोरसे, धूळे शहर अध्यक्ष‌ तथा मिडिया जिल्हा प्रमुख बिपिनचंद्र रोकडे, वकील आघाडीचे धुळे जिल्हा अध्यक्ष अॅड. विश्वनाथ महाजन, पियुष बोरसे (धुळे), तसेच जळगाव खान्देश माळी महासंघाचे जिल्हा सरचिटणीस शिवदास महाजन (भडगाव), महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे युवक जिल्हा अध्यक्ष देवराम महाजन (भडगाव), सुनिल सॉ मिलचे संचालक तथा माळी समाजाचे मार्गदर्शक सुनिल महाजन (भडगाव), मार्गदर्शक देविदास महाजन (भडगाव), अजय महाजन (भडगाव) सह महाजन परिवारातील सदस्य उपस्थित होते.  पोलिस उपनिरीक्षक (पी.एस.आय.), मुंबई वाल्मिक महाजन यांच्या आई, पत्नी, मोठी बहीण, मोठे भाऊ, मोठी भाऊजाई सह परिवाराने खडतर परिस्थितीला तोंड देऊन “तिमिरातुन तेजाकडे” या ब्रीद वाक्यानुसार वाल्मिक महाजन यांना पोलिस उपनिरीक्षक या पदापर्यंत पोहचवून समाजाचे नाव मोठे केले आहे. त्यांच्या कर्तव्याला दाद देत संपुर्ण परिवाराचा सत्कार त्यांच्या राहात्या घरी करून उपस्थितांनी ह्या परिवाराचा मागील परिस्थितीचा इतिहास जाणून, मनोगत व्यक्त करून भव्य सत्कार करून सर्वांचे मनापासुन अभिनंदन केले आहे. पोलिस उपनिरीक्षक वाल्मिक महाजन हे पाचोरा येथील सामाजिक कार्यकर्ते शाहिर विठ्ठल एकनाथ महाजन यांचे लहान बंधु आहेत. वाल्मिक महाजन यांचेवर परिसरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

Protected Content