पाचोरा शहरात हिवताप मोहीम सर्वेक्षण , जनजागृती

पाचोरा, प्रतिनिधी  । शहरात हिवताप मोहीम अंतर्गत सर्वेक्षण व जनजागृती करण्यात येत आहे. 

जिल्हा हिवताप अधिकारी अपर्णा पाटील व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे तसेच नगरपालिका मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण शहरात आरोग्यविषयक जनजागृती कंटेनर फेऱ्या , सर्वेक्षण,  दूषित पाण्याच्या टाक्यांमध्ये अबेट टाकणे ,  किटकजन्यरोधक फवारणी करणे  अशी कामे या मोहिमेअंतर्गत ग्रामीण रुग्णालय, आरोग्य कर्मचारी तसेच नगरपालिका कर्मचारी यांच्या मार्फत करण्यात येत आहेत . 

 नागरिकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे ? याबाबत मार्गदर्शन करताना  आरोग्य पर्यवेक्षक माळी, आरोग्य सहाय्यक गजानन काकडे, राजू गायकवाड , विकास पाटील यांनी नागरिकांना आवाहन करत सांगितले की, मच्छरदाणीचा वापर करावा,   घरातील पाण्याची भांडी झाकून ठेवावी  सात दिवसातून एकदा रिकामे करून स्वच्छ करून घासून – पुसून ठेवावी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, ताप आल्यास रक्ताची तपासणी करून घ्यावी, घराचा परिसर स्वच्छ ठेवावा. असेही आवाहन त्यांनीही  केले 

 

Protected Content