पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा रेल्वेस्थानकाजवळ एका अनोळखी पुरूषाचा मृतदेह आढळूल आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. याबाबत पाचोरा रेल्वे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पाचोरा रेल्वे स्थानकाजवळ रविवारी १७ जुलै रात्रीच्या वेळी मुंबईहुन दिल्लीच्या दिशेने जाणाऱ्या डाऊन राजधानी एक्सप्रेस (क्रंमाक – २२२२१) च्या इंजिन समोरील बाजुस रेल्वे कि. मी. खंबा क्रंमाक – ३७२ / १५ / १७ नजीक एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. मयताचे अंदाजे वय – ४५ वर्ष, उंची – ५ फुट ९ इंच, रंग – सावळा, शरीरबांधा – मजबुत, डोक्याचे केस – काळे, उजव्या हाताला कथ्या रंगाचा दोरा बांधलेला, तसेच भगव्या रंगाचा हाफ बाहीचा टी शर्ट, पांढऱ्या रंगाचे बनियान, काळपट रंगाची जिन्स पॅन्ट परिधान केलेली आहे. मयत इसमाबाबत कोणास काहीही माहिती असल्यास त्यांनी लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्र, पाचोरा येथे ९६६५२०२१२१ या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्र, पाचोरा तर्फे करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास चाळीसगावचे प्रभारी ए. पी. आय. किसन राख यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल एम. व्ही. भावसार हे करीत आहे.


