*पाचोरा, प्रतिनिधी* | येथील सुपडु भादु प्राथमिक विद्यामंदिरात शालेय व्यवस्थापन समितीची सभा चेअरमन जगदीश सोनार यांच्या अध्यक्षतेखाली आज उत्साहात संपन्न झाली.
पाचोरा येथील श्री.सु.भा.पाटील प्रा. विद्यामंदीर येथे आज रोजी शालेय व्यवस्थापन समितीची सभा शालेय समिती चेअरमन जगदीश सोनार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. कार्यक्रमाची सुरुवात सी. डी. एस. जनरल बिपीन रावत व सर्व सहकाऱ्यांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली. यावेळी मान्यवरांचे स्वागत शाळेच्या मुख्याध्यापकांनी केले. सभे पुढील सर्व विषयावर सविस्तरपणे चर्चा करून सर्वानुमते मंजूर करण्यात आले. त्याचप्रमाणे शाळेच्या नूतन मा.मुख्याध्यापकांचा सर्व मान्यवरांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्यात.
या सभेला शालेय समिती चेअरमन जगदीश सोनार, संचालक दुष्यंत रावळ, सीताराम पाटील, एस. डी. पाटील, शाळेचे मुख्याध्यापक अशोक परदेशी, शिक्षक प्रतिनिधी गणेश सोनवणे, तुषार जळतकर यांची उपस्थिती होती. दरम्यान सूत्रसंचलन व इतिवृत्त वाचन-लेखन दीपक पाटील यांनी तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापकांनी केले.