पाचोरा येथे वाढीव विजबिला विरोधात भाजपाची स्वाक्षरी मोहीम (व्हिडीओ)

पाचोरा प्रतिनिधी । कोरोनाच्या काळात सत्ताधारी सरकारने मोठ्या प्रमाणावर विजेचे बिल वाढविले आहे. याच्या निषेधार्थ शहरात भाजपातर्फे स्वाक्षरी मोहिम राबविण्यात आली आहे.

कोरोना महामारीच्या काळात वाढीव व अवाजवी विज बिलात सवलत देण्याची घोषणा ठाकरे सरकारने केली होती. पण आता विज बिलात सवलत देता येणार नाही, नागरिकांना ती भरावीच लागतील. असे सांगुन सक्तीने विज बिले वसुल करण्याचे काम ठाकरे सरकारने सुरू केले आहे. या सरकारला सत्तेच्या धुंदीतुन जागे करुन जनतेला सवलत देण्यास भाग पाडुन न्याय मिळवुन देण्यासाठी शासन दरबारी निवेदन देण्यात आले असुन २५ रोजी पाचोरा भाजपातर्फे तालुका अध्यक्ष अमोल शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली व शहराध्यक्ष रमेश वाणी यांचे नेतृत्वाखाली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकासह मुख्य चौकात महाआघाडी सरकारच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. यावेळी शहर उपाध्यक्ष हेमंत चव्हाण, सुधीर पुणेकर, शहर चिटणीस जगदिश पाटील, दिपक माने, युवा मोर्चा सरचिटणीस योगेश ठाकुर, कोषाध्यक्ष रमेश शामदाणी, तालुका सरचिटणीस संजय पाटील, शरद सोनार सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2801598906823050/

Protected Content