पाचोरा, प्रतिनिधी । मोहम्मद रफी यांच्या ४१ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना पाचोरा येथील ऑर्केस्ट्रा मेलडी किंगच्या कलावंतांनी आपल्या सुमधूर गीतांनी श्रद्धांजली अर्पण केली.
मोहम्मद रफी यांच्या “जाने चले जाते है कहा दूनिया से जाने वाले”, “दिल का सूना हाल”, “तकदीर का फसाना, आवाज मै ना दुंगा”, “जट यमला पगला दिवाना”, “आने से उसके आये बहार”, “तू इस तरह से मेरी जिंदगी मे शामिल है”, “दर्दे दिल दर्दे जिगर” यासारख्या अनेक गीतांनी प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय मोहम्मद रफी यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. प्रतिमापूजन मंडळ अधिकारी संजय साळुंखे यांनी केले. याप्रसंगी राकेश सपकाळे, अजय अहिरे, रहीम तडवी, मनोज चौबे, रितेश प्रजापत, संजय साळुंखे, सुनील नवगिरे यांनी गीत सादर केले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते आनंद नवगिरे, युवराज खेडकर, राजू गायकवाड, अभय अहिरे आदी उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता “यम्मा यम्मा ये खुबसुरत समा” या गीताने झाली.