पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा येथील समर्थ कॉलनीतील रहिवासी व मुळचे अंतुर्ली बु” तालुका भडगाव येथील रहिवासी माजी सैनिक ओंकार पितांबर पाटील यांचे शुक्रवारी १९ रोजी शुक्रवारी पहाटे चार वाजेच्या दरम्यान हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
मृत्यू समयी त्यांचे वय ४३ वर्ष होते. ते १४ वर्षाच्या भारतीय सैन्यातील सेवेनंतर मुंबई येथे खाजगी कंपनीत नोकरी करीत होते. पाचोरा येथे ११ मे रोजी नातेवाईकात विवाह असल्याने ते १० मे रोजी मुंबई येथून पाचोऱ्याला आले होते. मयत ओंकार पितांबर पाटील यांचे पश्चात दोन भाऊ, पत्नी, एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे. त्यांचेवर सायंकाळी ६ वाजता अंतुर्ली बु” तालुका भडगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.