Home क्राईम पाचोरा येथे चोरट्यांनी घरातून ४८ हजाराची रोकड लांबविली

पाचोरा येथे चोरट्यांनी घरातून ४८ हजाराची रोकड लांबविली


पाचोरा प्रतिनिधी । शहरातील आशिर्वाद रेसिडेन्सी येथील एका घरात प्रवेश करुन अज्ञात चोरट्याने कपाटात ठेवलेले ४८ हजार रुपये लांबविल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील आशिर्वाद रेसिडेन्सी मध्ये वास्तव्यास असलेल्या सुचिता सुभाष सुर्यवंशी (वय – ६९) ह्या काही कामानिमित्त घराबाहेर असताना घरात अनाधिकृतपणे प्रवेश करुन कपाटात ठेवलेले ४८ हजार रुपये (२०००, ५०० व १०० रुपयांच्या नोटा) अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याने सुचिता सुर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक दिपक सुरवाडे हे करीत आहे.


Protected Content

Play sound