पाचोरा येथे कृषि महोत्सव सप्ताहाचे आ. किशोर पाटील यांच्याहस्ते उद्घाटन

पाचोरा प्रतिनिधी । शहरातील दत्त कॉलनीतील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जागतिक कृषि महोत्सव-२०२१ चे उद्घाटन आमदार किशोर पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.

श्री. स्वामी समर्थ अध्यात्मीक व बाल संस्कार सेवा केंद्र (दिंडोरी प्रणित) पाचोरा यांचे व आखिल भारतीय श्री. स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मीक विकास मार्गाचे अर्ध्वयु गुरुमाऊली प. पु. आण्णासाहेब मोरे यांच्या आशिर्वादाने व चंद्रकांतदादा मोरे यांच्या आदेशानुसार पाचोरा व पंचक्रोषीतील शेतकरी बंधु भगिनींसाठी व समस्त जनतेसाठी श्री. स्वामी समर्थ सेवा केंद्र दत्त कॉलनी, पाचोरा या ठिकाणी भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्त साधून जागतीक कृषि महोत्सव – २०२१ अंतर्गत सुरु झालेल्या २२ जानेवारी ते २८ जानेवारी, २०२१ या सप्ताहा अंतर्गत तालुकास्तरीय शेतकरी मेळावा कृषि महोत्सव आयोजित करण्यात आला होता.

सदर मेळाव्याचे उद्घाटन आमदार किशोर पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी  नगराध्यक्ष संजय गोहिल, उद्योजक मुकुंद बिल्दीकर, मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष दिपक पाटील, उपविभागीय कृषि अधिकारी एन. व्ही. नयनवाड, तालुका कृषि अधिकारी ए. व्ही. जाधव, सामाजिक कार्यकर्त्या वृंदा सोमवंशी, प्रा. मनिष बाविस्कर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. बाल गोपाल सेवेकरी स्वयं अमृतकर याने पॅनो व नंदीनी पाटील व यशश्री शेंडे यांनी राष्ट्रगीत गायन करुन तर दिग्वीजय अविनाश पाटील या बालकाने गणपती अथर्व शिर्षाचे पठण करुन कृषि महोत्सवास सुरुवात झाली. प्रास्ताविक मनिष बाविस्कर यांनी केले. गिरीष दुसाने यांनी सुत्रसंचालन केले.  कृषि विभागाचे तंत्रज्ञान व्यवस्थापक सचिन भैरव, मंडळ अधिकारी एस. डी. पाटील, एम.एस. मोरे, एस.पी. बोरसे, निलेश पाटील, विनोद पाटील,

आर. पी. पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती व माहिती पत्रके उपस्थितांना दिली.  तालुक्यात २५ जानेवारी रोजी आसनखेडा, २३ जानेवारी रोजी शिंदाड २४ जानेवारी रोजी खेडगाव (नंदीचे),  २५ जानेवारी रोजी डोंगरगांव,  २६ जानेवारी, रोजी दत्त कॉलनी पाचोरा व लोहारा या दोन ठिकाणी कृषी महोत्सव साजरा करण्यात आला. तर २७ रोजी पिंप्री (सार्वे) येथे व २८ रोजी गिरड ता. भडगांव येथे दुपारी २ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत कृषि महोत्सव आयोजित केलेला आहे. तरी याचा लाभ सर्व संबंधीतांनी घेण्याचे अवाहन स्वामी समर्थ केंद्राचे वतीने करण्यात आलेलं आहे. प.पूज्य गुरुमाऊलींच्या आदेशानुसार दरवर्षी नाशिक येथे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या सहकार्याने कृषि महोत्सव होत असतो परंतु कोविड – २०१९ करोना महामारीमुळे यावर्षी प्रथमच महाराष्ट्रातील प्रायेक तालुक्यातील खेडोपाडी स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या माध्यमाने हा सप्ताहा साजरा करण्यात येत असल्याने राज्यातील गोरगरीब कष्टकरी व जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी बांधवांना गोवंश वार, गोवंश हत्या, सेंद्रिय शेती, शेतीशास्त्र, आयुर्वेदीक विभाग, स्वयंरोजगार विभाग, विवाह संस्कार विभाग, बाल संस्कार विभाग, मराठी अस्मिता विभागासह विविध प्रकारचे योग्य व विनामुल्य मार्गदर्शनामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यास नक्कीच हातभार लागेल शेतकरी जगला तरच देश जगेल असे प्रतिपादन आमदार किशोर पाटील यांनी याप्रसंगी केले.

 

यासाठी स्वामी समर्थ सेवा केंद्र करीत असलेल्या या उल्लेखनिय कार्याचे कौतुक उपस्थित मान्यवरांनी केले. कृषि महोत्सव यशस्वितेसाठी याच महिला सेवेकरी भगीनींना वृंदा सोमवंशी, दिपक पाटील, शंभू पाटील, अविनाश पाटील, रमेश वाराळे, नितीन चौथरी,  परदेशी यांचेसह सर्व सेवेकरी बंधु भगिनींनी योगदान दिले. रेखा राजेंद्र पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. कृषि महोत्सवा ठिकाणी शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये सेंद्रीय पध्दतीने पिकविलेल्या संत्री, मोसंबी, केळी, पपई, लिंबु, शेवगा, हळद, मिर्ची पावडर, गरम मसाला व गुळ गुळाची चिक्की सेधव मिठ इत्यादी फळ फळे व भाजीपाला शेतकरी से ग्राहक या योजनेच्या माध्यमातुन उपलब्ध करुन देण्यात आलेले होते. सदर महोत्सवामध्ये दिवसभर शेकडो पुरुष व महिलांनी उपस्थिती लावुन या आगळ्या-वेगळ्या आणि प्रात्यक्षिकांचा लाभ घेवून महोत्सव घेतल्याबद्दल आयोजकांचे कौतुक करनांना दिसून आले सदर महोत्सवाची सांगता अल्पोपहार व चहापान वाटप करण्यासाठी बाल गोपालांनी परिश्रम घेतले.

Protected Content