जळगाव प्रतिनिधी । दुभाजकावर वाहन आदळल्याने अपघातात कुटुंबातील तीन जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पाचोरा भडगाव रोडवरील निर्मल सीड्सजवळ घडली.
प्रत्यक्षदर्शींनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तत्काळ वाहनातून जळगाव येथे खासगी हॉस्पिटलमध्ये हलविले. चाळीसगाव येथुन आल्यानंतर कुटुंबीय वाहनात बसून येत असताना ही घटना घडली. सागर नामदेव पाटील (30), पूजा सागर पाटील (25) तसेच अलकाबाई नामदेव पाटील (59) रा. अयोध्यानगर हे जखमी झाले. तिघांना तत्काळ जळगाव येथे खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.